उदगीर: उभा असलेल्या ट्रेकचे चाक अचानकपणे जमिनीत घुसले,मोठा अनर्थ टळला, हाळी येथील घटना
Udgir, Latur | Oct 7, 2025 उदगीर तालुक्यातील हाळी येथे ट्रकचे चाक अचानक पणे जमिनीत घुसल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली आहे,हाळी येथील रोड लगत असलेल्या बसस्थान कासमोरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी म्हणुन ट्रक चालकाने ट्रक रोड लगत उभा करुन हाॅटेलात गेला असता,केए.५६-५५९४ या क्रमांकाचा उभा केलेल्या ट्रकची चाक अचानक जमीनीत घुसल्याने ट्रक त्या बाजूने थोडासा कलंडला होता. आणखी थोडा कलंडला असता तर स्फोटच झाला असता.कारण,ट्रक ज्या बाजूने झुकला होता त्याच्या एकदम २ फूट अंतरावर विद्युत पुरवठा करणारा डी पी होता.