धुळे जिल्ह्यात वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा देणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी स्पष्ट करत आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. शासकीय रुग्णालयांतील प्रसुती, पीसीपीएनडीटी कायदा, स्वच्छता, बालविवाह प्रतिबंध व माता मृत्यूच्या विश्लेषणावर भर देण्यात आला. यावेळी सीईओ अजिज शेख यांनी आयुष्यमान भारत, टीबी मुक्त भारत व ‘निक्षय मित्र’ उपक्रम प्रभावी राबवण्याचे आवाहन केले.