कन्नड: एसटी आरक्षणावर डाका नको; कन्नड तहसील कार्यालयात धडकला आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा
'हैद्राबाद गॅझेट' या भूतकाळातील कागदपत्रांचा उल्लेख होताच, अनुसूचित जमातींच्या (एस.टी.) ७ टक्के आरक्षणावर दावा सांगण्यासाठी काही राजकीय शक्तींनी कट-कारस्थान सुरू केले आहे. परंतु आदिवासीच्या एसटीच्या आरक्षणावर कोणालाही डाका घालु दिला जाणार नाही असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी दिला.कन्नड तहसील कार्यालयावर सकल आदिवासी समाजाच्या वतीने एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १) रोजी 'आदिवासींचा मोर्चा धडकला.