वर्धा: मोठी कारवाई! सावंगी मेघे पोलिसांकडून १५ लाखांचा मोहा दारूचा साठा जप्त; अवैध धंद्यांना हादरा..
Wardha, Wardha | Nov 10, 2025 अवैध गावठी मोहा दारू विक्रेत्यांवर सावंगी मेघे पोलिसांनी मोठी कारवाई केली या विशेष मोहिमेअंतर्गत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला. आज 10नोव्हें रोजी सावंगी मेघे पोलिसांनी पारधीबेडा पांढरकवडा व शीखबेडा यांसारख्या ठिकाणी छापे टाकले.या कारवाईत पोलिसांनी तयार दारू हजारो लिटर कच्चा मोहा चढवा, रसायन, भांडी व इतर साहित्य असा एकूण 15लाख 3हजार 500 रुपयांचा प्रचंड मुद्देमाल जप्त केल्याचे सायं 7 वा प्रसिद्धीच दिले.