राहुरी: बारागाव नांदूर येथे उस तोडणी मुकादामुखांच्या खिशातील पैसे काढून मारहाण
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे मजूर घेऊन जाण्यासाठी आलेल्या ऊसतोड मुकादमाला आरोपींनी शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ५० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडलीय. अर्जुन भिमराव पाटील, वय ५८ वर्षे, व्यवसाय ऊसतोड मुकादम, रा. नांद्रे ता. चाळीसगांव, जि. जळगांव, यांनी राहुरी तालुक्यातील बारगांव नांदुर येथील काही मजुरांना १४ लाख रुपए रोख व ऑनलाईन दिले होते.