वेंगुर्ला: मातोंड गावामध्ये बिबट्याचे दर्शन ; स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबराट
मातोंडमध्ये सध्या बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे. गेले दोन दिवस येथील ग्रामस्थांना हा बिबट्या दृष्टीस पडत आहे. वनविभागानेही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सध्या होत आहे.