धुळे: टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार; कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मूक मोर्चा.
Dhule, Dhule | Nov 9, 2025 सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात धुळ्यात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. पुनर्विचार याचिका दाखल करावी, १५ मार्चचा संचमान्यता निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि ऑनलाइन कामे बंद करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. सरकारने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.