तळा: तळा:माझा रायगडच्या जनतेवर विश्वास.रायगडचा खासदार मीच होणार-अनंत गीते.
Tala, Raigad | Apr 22, 2024 माझा रायगडच्या जनतेवर विश्वास आहे.ते मला मतदान करतील आणि रायगड चा खासदार मीच होणार असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवार दि.२२ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान तळा शहरातील पोस्ट ऑफिस मैदान येथे केले.तळा शहरातील पोस्ट ऑफिस मैदान येथे इंडिया आघाडीच्या वतीने प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.