पुणे शहर: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; घायवळला कोणाचा वरदहस्त?
Pune City, Pune | Sep 28, 2025 कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पसार झाला असून तो लंडनला पळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी आधीच लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दरम्यान, घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील बनावट पत्ता वापरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पासपोर्ट मिळण्यात अडथळे येऊ शकतात, हे ओळखूनच त्याने खोटा पत्ता दिल्याचे स्पष्ट झाले आहे.