अमरावती: जागावाटपावर सकारात्मक चर्चा; “युती नक्की होईल, कोणतीही अडचण नाही” – मुख्यमंत्री फडणवीस
जागावाटपावर सकारात्मक चर्चा; “युती नक्की होईल, कोणतीही अडचण नाही” – मुख्यमंत्री फडणवीस अमरावती - अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. “जागा वाटपा संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. मला अपेक्षा आहे की लवकरच हा तिढा सुटेल. युती नक्की होईल आणि कोणतीही अडचण होणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.