संगमेश्वर: साडवली येथे वन विभागाने जखमी बिबट्याची केली यशस्वी सुटका
संगमेश्वर तालुक्यातील मौजे साडवली-कासारवाडी येथे आज सकाळी बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने कार्यवाही करत त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. सकाळी ९:३० वाजता पोलीस पाटील यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, श्री. राजेंद्र धने यांच्या घरामागे एक बिबट्या एकाच ठिकाणी बसलेला आढळला. हा बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे आहे. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम झाल्यामुळे तो अडचणीत सापडला होता.