औंढा नागनाथ: सिद्धेश्वर धरणातून कॅनॉलद्वारे सोडले पाणी; 60 हजार हेक्टर वरील रब्बी पिकांना होणार लाभ
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून कॅनलद्वारे रब्बीतील शेती पिकांसाठी पहिली पाणी पाळी 25 नोव्हेंबर पासून सोडण्यात आली 18 डिसेंबर पर्यंत चालणार आहे या पाण्यामुळे परभणी,हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील तब्बल 60 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या फळबागासह गहू,हरभरा,ज्वारी पिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत असून ही पहिली पाणी पाळी 18 डिसेंबर पर्यंत चालणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिनांक 26 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी चार वाजता दिली.