बकरी घेण्यात येण्यावरून झालेला हा वाद तरुणांमुळे झाला. या गैरसमजातून एका महिलेने तरुणाला शिवीगाळ करत चपटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाजूला पडलेला लोखंडी झरा तरुणाच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता सुप्रीम कॉलनीत घडली आहे. या संदर्भात रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.