चामोर्शी: पोहर नदीवरी पुलाजवळ ट्रक फसल्याने, चामोर्शी - गडचिरोली मार्गावरील वाहतुक ठप्प .
चामोर्शी : आज, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील पोहर नदीच्या नवीन पुलाजवळ एक ट्रक उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, ज्यामुळे शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.सध्या शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू असल्याने, अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी याच मार्गाचा वापर करतात. वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचणे कठ