परिवहन विभागाच्या वाहन, सारथी तसेच ई-चालान या संगणकीय प्रणालीद्वारे वाहन नोंदणी, वाहन परवाना तसेच ई-चालान संबंधित कामकाज केले जाते. या सेवांशी संबंधित बनावट संकेतस्थळ, फसवे मोबाईल ॲप्स तसेच एसएमएस, व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या खोट्या लिंक्स मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवीत आहे, त्यामुळे असे बनावट संकेतस्थळ व फसव्या मोबाईल ॲपपासून वाहनचालकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.