शिरपूर: तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थींचा तहसील कार्यालयावर मोर्चा,त्वरित निर्णय न झाल्यास मुंबईकडे निघणार मोर्चा
Shirpur, Dhule | Sep 18, 2025 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या शिरपूर तालुक्यातील युवक-युवतींनी कायमस्वरूपी रोजगार, मानधनवाढ व अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन दिले. यावेळी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास मुंबईकडे पायी मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनातुन देण्यात आला.