वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या विरोधात एका आदिवासी महिलेने गंभीर आरोप करत तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वणी येथील तहसील कार्यालयासमोर चहाचे दुकान चालवणाऱ्या आदिवासी समाजातील महिला रिना नंदु जुमनाके यांनी वणी पोलिस ठाण्यातील ठाणेदारावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच चहाचे दुकान फेकून देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्याकडे लेखी तक