माजलगाव: सुर्डी जवळ अपघात; ट्रान्सफॉर्मर उद्ध्वस्त, चालक किरकोळ जखमी
मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्याने, एका कारने लाईटच्या ट्रान्सफॉर्मरला जोराची धडक दिली. या अपघातात मेन लाईनसह ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदरील घटना माजलगाव तालुक्यातील सुर्डी परिसरात रविवार दि.9 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता घडली.या अपघातात एक चालक किरकोळ जखमी झाला असून एमएच १२ जीएफ ४००० क्रमांकाच्या कारचे मोठे नुकसान झाले, घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.