उमरी: बोळसा येथे 4 लाख 80 हजार किमतीचे घरासमोरील दोन ट्रॅक्टर हेडची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Umri, Nanded | Nov 7, 2025 नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे बोळसा येथे दि 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री आठ ते दि 5 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे तीनच्या दरम्यान फिर्यादीचे घरासमोर महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर तसेच आनंदा अपुलवार यांचे हेड जुडिअर कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक 26 सीपी 3761 व एमएच 26 बीक्यू 2162 असे एकूण किमती 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.याप्रकरणी फिर्यादी पंडित वडजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी उमरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे