नागपूर ग्रामीण: बोखारा येथे दिवसाढवळ्या अज्ञात आरोपीने घरफोडी करून एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून
पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील बोखारा येथे राहणारे निखिल रोकडे व त्यांची पत्नी सौ पुनम या घराला कुलूप लावून कामावर गेल्या असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि सोन्याचे वेगवेगळे दागिने तसेच घड्याळ असा एकून एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.