समुद्रपूर: दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या पियुष मोटघरे याचा गिरड येथील विकास विद्यालयाकडून सत्कार
२७ मेला लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात गिरडच्या विकास विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असुन येथिल विद्यार्थी शेतकरी पुत्र पियुष सुधाकर मोटघरे यांने 92.60 टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान राखला आहे आज मंगळवारी २८ मे रोजी १२ वाजता शाळेत या पियुष मोटघरे त्याचे आई वडील यांचा पुष्पगुच्छ व वृक्ष भेट देऊन सत्कार करीत पियुषला पुढिल शैक्षणिक वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्या.