समुद्रपूर: नंदोरी परीसरात वादळाचे थैमान:शेकडो इलेक्ट्रॉनिक पोल व झाडे जमिनीवर कोसळले: घराचे छत उडाले:मोठ्या प्रमाणात नुकसान
नंदोरी परीसरात वादळीवाऱ्याने तांडव करीत थैमान घातले यावेळी या वादळाच्या तडाख्यात शेकडो इलेक्ट्रॉनिक पोल जमिनीवर कोसळले असुन अनेक घरांचे छत उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी २७ मे रोजी ४ वाजताच्या सुमारास जाम परीसरात पाऊस तर नंदोरी परीसरात वादळाला सुरुवात झाली यावेळी पाहता पाहता या वादळाने रौद्ररूप धारण करून परीसाला आपल्या कवेत घेतले या वादळाच्या तडाख्यात शेकडो इलेक्ट्रॉनिक पोल व झाडे जमिनीवर कोसळले तर अनेक घराचे छत उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.