औंढा नागनाथ: प्रचार दौऱ्यानिमित्त नांदेड कडे जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रामेश्वर फाटा येथे स्वागत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगरपालिका प्रचार दौऱ्यानिमित्त नांदेड कडे जात असताना दिनांक 24 नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर फाटा येथे त्यांचे कार्यकर्त्यांकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय दराडे, युवा नेते प्रवीण टोम्पे, भगवानराव इघारे, गोपाल मगर सह इतरांची उपस्थिती होती.