भिवंडी: भिवंडी दोन मजली इमारत कोसळली, तळमजल्यावरील दुकानदार मात्र.....
Bhiwandi, Thane | Oct 25, 2025 भिवंडी परिसरातील आजमी नगर येथे एक चाळीस वर्षे जुने बांधकाम असलेले इमारत अचानक कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या इमारतीच्या तळमजल्यावरील किराणा दुकान आणि पहिल्या मजल्यावरील काही नागरिक राहत होते, मात्र इमारत कोसळली त्यावेळी इमारतीत कोणीही नव्हते परंतु तळमजल्यावरील किराणा दुकानात दुकानदार अडकला होता.अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि दुकानदाराला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु रहिवाशी इमारतीत असते तर मोठी दुर्घटना घडli असती.