महाड: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडीतील गीताबाग येथे अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
Mahad, Raigad | Sep 14, 2025 आज रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडीतील गीताबाग येथे रोहा तालुक्यातील लांढर येथील शिवसेना (उबाठा) गटाचे राम महाडिक, विशाल टेंबे, कैलास माने, संदिप शिंदे, प्रकाश धाडसे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नवप्रवेशितांचे पक्षात स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.