परराज्यातून खरेदी केलेली जेसीबी यंत्राची गोंदिया आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्याकरिता खाजगी इसमार्फत 70 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त प्रभार) यांच्यावर नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रुचून 4 डिसेंबर रोजी कारवाई केली. राजेंद्र केसकर वय 53 वर्षे असे लाचखोर आरोपीचे नाव आहे. केसकर यांनी राजेश माहेश्वरी या खाजगी इसमार्फत लाच स्वीकारली.