यवतमाळ: रुईत विजेचा लपंडाव कायम; नागरिक संतप्त
रुई परिसरात मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक संतापले आहेत. ३३ केव्ही फिडर वारंवार बंद पडत असल्याने दिवसात दहा-पंधरा वेळा वीज खंडित होते. तांत्रिक बिघाड दुरुस्तीनंतरही समस्या कायम असून पाणीपुरवठा वेळापत्रक कोलमडले आहे. महिलांसह सर्व नागरिक त्रस्त झाले असून वीज कंपनीच्या वरिष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.