जालन्यातील सायगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणार्यांवर पोलिस व महसूल विभागाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. गुरुवार दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 45 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन तिप्पर वाहने ताब्यात घेण्यात आली असून जेसीबी वाहन मात्र चालकासह पसार झाले आहे. दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सायगाव शिवारातील दुधना नदी पात्रात काही जण जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती मिळाली होती.