तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात तब्बल 32 करोड रुपये जमा झाल्याची माहिती तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दि. 31 ऑक्टोबर रोजी दिली आहे. जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात शिरल्याने हजारो शेतकर्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट झाले, त्याचबरोबर माती वाहून गेली होती.