स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून, गोंडवाना गणतंत्र पार्टीने भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुमित मेंढे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. या विजयामुळे भाजपच्या 'कमळा'वर गोगपाच्या 'आरी'ने प्रहार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.