दीपावलीनंतरच्या परंपरेनुसार ग्राम चांदणीतोला (बोळुदा) येथे मंडई मेला उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.या प्रसंगी आयोजित आर्केस्ट्रा छत्तीसगढी सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामस्थांसह विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला सुंदर,रंगतदार आणि संस्कृतीचा साज चढवला.कार्यक्रम मनोरंजक, सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा,परंपरेचा वारसा उजळविणारा ठरला.या वेळी ग्रामवासीयांनी मनमोकळा सहभाग घेतला.यावेळी जीडीसीसी बँक संचालक दुर्गा ठाकरे,जि.प.सदस्य शलैश नंदेश्वर उपस्थित होते