देसाईगंज वडसा: कोंढाण्याच्या जंगल परिसरात वन विभागाकडून वनराई बंधाऱ्याची निर्मिती
वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देसाईगंज वनविभागाकडून कोंढाळाच्या जंगल परिसरातील ओढ्यावर टाकावू वस्तूंपासून बंधारा बांधण्यात आला. वनकर्मचाऱ्यांनी श्रमदान करून निर्माण केलेल्या या बंधाऱ्यामुळे त्या परिसरातील वन्यप्राण्यांना जंगलात बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे.