गोदावरी नदीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मौजे चिंचोली तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथील ग्रामस्थ "धरण उशाला आण कोरड घशाला" या उक्तीप्रमाणे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. याचे कारण म्हणजे मागील तीन वर्षापासून गावात उभारलेल्या पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच बंद आहे. त्याकरिता पाणी समस्या लक्षात घेता गावकरी शंकर वासणीकर हे मागील दोन दिवसापासून आमरण उपोषण करत असून आज त्यांचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे.पाण्याची समस्या दूर झाली तरच आपण ही उपोषण मागे घेऊ असे म्हटले