वैजापूर: नगराध्यक्ष पदासाठी आमदार बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल
शिवसेनेकडून आमदार रमेश बोरनारे यांचे लहाने बंधू संजय बोरनारे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल करण्यात आला असून यावेळी आमदार रमेश बोरनारे,माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, साबेर खान,खुशालसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.