देवरी तालुक्यातील शिलापूर येथील दयाराम हुकरे वय 73 वर्षे यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. तीन डिसेंबर रोजी त्यांनी विष प्राशन केल्याने त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटने संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.