माण: दहिवडी येथे अॅग्रो पाईट दुकानाच्या समोर एकावर कोयत्याने वार, दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Man, Satara | Sep 18, 2025 दहिवडी फलटण रोडला अॅग्रो पाँईट दुकानाच्या समोर दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता प्रसाद नितीन साखरे वय २३, रा. वरची खताळवस्ती दहिवडी हा चहा पित उबा असताना यशवंत खाडे, अरुण नामदेव खताळ हे दोघे ट्रॅक्टरमधून मका घेवून खताळवस्तीकडे चालले होते. त्यांनी प्रसादकडे बघून ट्रॅक्टर थांबवत तु आमची वाट का अडवली आहेस, असे म्हणून यशवंतने कोयत्याने प -सादच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ व डाव्या हाताच्या करंगळीच्या शेजारी कोयता मारुन जखमी केले.