लालपुलीया परिसरातील एका हॉटेल मध्ये मध्यरात्री मारहाणीची घटना घडली. जेवणानंतर गप्पा करीत असताना तिथे आरोपी आला. त्याने लोखंडी रॉडने ट्रक चालकावर हल्ला केला. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपी प्रवीण प्रकाश राक्षसमारे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.