वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युतीला नगराध्यक्षपदासह सदस्यांच्या 15 जागांवर विजय मिळाला.. तर शिवसेना शिंदे गटाला 10 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय बोरणारे यांचा 6 हजार 248 मतांनी पराभव केला.