वाई: पाचवड येथे हनी ट्रॅपचा वाईतल्या व्यापाऱ्यांवर प्रकार, भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा
Wai, Satara | Oct 20, 2025 वाई तालुक्यातील पाचवड येथील बसस्थानकाच्या बाहेर तसेच एका लॉजच्या बाहेर, दि. ३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरच्या दुपारी ३ वाजेच्या दरम्यान एका महिलेने समक्ष भेटून तसेच व्हॉट्सअॅप कॉल करुन २० लाख रुपये आणि वाईमध्ये राहण्यासाठी घर, नोकरी देण्याची मागणी करुन ते न दिल्यास वाई येथील ४१ वर्षीय व्यापाऱ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देवून २ लाख रुपयाचा चेक व ७ हजार ६९ रुपये फोन पे द्वारे त्या व्यापाऱ्याकडून त्या महिलेने घेतले.