वर्धा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. जुनापाणी परिसरात खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ रक्ताचा सडा पडला होता.मिळालेल्या माहितीनुसार, सदर खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन नागपूरच्या दिशेने जात होती.