दारव्हा: बोदेगाव येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
दारव्हा तालुक्यातील बोदेगांव येथील ५५ वर्षीय शेतकरी सिद्धार्थ जनार्दन खडसे यांनी दि. १२ ऑक्टोंबरला सकाळी ९. ०० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीतील नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सिद्धार्थ यांनी बोदेगाव ते सांगलवाडी रस्त्यावरील गायरान परिसरात पळसाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.