लाखनी तालुक्यातील राजेगाव मोरगाव येथे ०४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता क्षुल्लक वादातून हाणामारीची घटना घडली. फिर्यादी विक्की बळीराम कुंभरे यांच्या घरासमोर एका व्यक्तीने दुचाकी उभी केली होती. फिर्यादीने 'माझ्या घरासमोर दुचाकी का लावली?' असे विचारले असता, त्या व्यक्तीने दुचाकी बाजूला केली. मात्र, त्याचवेळी उपस्थित असलेला आरोपी मनोहर शिवराम डोंगरवार याने कोणताही ठोस कारण नसताना फिर्यादीशी तोंडातोंडी भांडण सुरू केले, शिवीगाळ केली आणि काठीने फिर्यादीच्या डाव्या पायावर मारले.