पवनी: पवनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार भोंडेकर यांच्या हस्ते अनावरण
Pauni, Bhandara | Oct 14, 2025 धम्मप्रभास बुद्धविहार समिती पवनी यांच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते मंगळवारी, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले. या वेळी बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई हे संघर्ष, समता, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांचे सदैव प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याने आणि विचारांनी आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखविला आहे.