यवतमाळ: दिव्यांग ई रिक्षा योजनेत जिल्ह्यातही ८ लाभार्थ्यांना लाभ ; उर्वरित लाभार्थी वंचित
महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ या वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मोफत ई-रिक्षा देण्याची योजना जाहीर केली होती. यवतमाळ जिल्ह्यातून एकूण १,८८५ दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्ज भरले असताना त्यापैकी केवळ १८ लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित १,८६७ लाभार्थ्यांचे काय?, असा थेट सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी उपस्थित केला आहे.