संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्याची धक्कादाय घटना घडली
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व प्रगती अविनाश पवार (रा. चंदनापुरी) या विवाहितेला पती, सासरे, सासू, नणंद व नंदाई यांनी पैशांसाठी तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सतत त्रास दिला. वारंवार मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक छळामुळे ती प्रचंड त्रस्त झाली होती. अखेर प्रगतीने या जाचाला वैतागून गळफास घेऊन जीवन संपवले.