यवतमाळ: शहरातील मीना हॉटेल समोर वाहनाचा कट मारल्याच्या कारणातून एकावर चाकू हल्ला,आरोपी विरुद्ध यवतमाळ शहर पोलिसात गुन्हे दाखल
वाहनाचा कट मारल्याच्या कारणातून एक अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना 5 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास शारदा चौक ते पांढरकवडा मार्गावरील मीना हॉटेल समोर घडली. शिवम काकडे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या अल्पवयीन युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बिलाल शेख याच्यासह तिघांविरुद्ध यवतमाळ शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.