नांदुरा: शेतकऱ्यांसाठी दिलास! ई–पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ– तहसीलदार अजितराव जंगम
शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ई पिक पाहण्यासाठी आता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार अजितराव जंगम आणि प्रसार माध्यमांद्वारे दिली आहे.   नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई,पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी, पिक कर्ज मिळवण्यासाठी इ पिक पाहणी महत्वाची असून सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.