पक्षाघात हा ताणतणावाची जीवनशैली, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, अपुरी झोप, असंतुलित आहार, कमी शारीरिक हालचाल, उच्च कोलेस्टेरॉल तसेच धूम्रपान व मद्यसेवन यांसारख्या कारणांमुळे होऊ शकतो. या सर्व जोखीम टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक आहे. नियमित व्यायाम, सकस आहार, ताणतणाव नियंत्रण, पुरेशी झोप, धूम्रपान-मद्यसेवनाचा त्याग तसेच रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी यामुळे हृदयरोग, पक्षाघात, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.