बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी 12 मार्चला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला बजाज नगर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा चोरटा पोलीस पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी दिली आहे.