राहुरी: पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत संपन्न
राहुरी पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण,तसेच जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. उप जिल्हाधिकारी मनीषा राशिनकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले तर तहसीलदार नामदेव पाटील व नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी सोडत प्रक्रिया राबवली.